- सन २०२४/२५ - करवीर
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली



- सन २०२४/२५ - करवीर
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली
- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत चिंचवाड
सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत आहे
- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत चिंचवाड
लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कर्मवीर लायब्ररीची स्थापना केली
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली .चचचवाड गाव हेपूवी पंचगंगा नदीपासून जवळच अधाा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते .वारंवार पावसाळ्यामध्ये गावाला पुराचा वेढा बसत असल्याने गाव वसवणे अत्यंत गरजेचे होते .सदर गाव मा .कलेक्टर शेख साहेब यांनी १९४६ /४७ साली गावची पाहणी करून यांच्या मागादशानाखाली नवीन वसाहत स्थापन करण्यात आली .ती नवीन वसाहत म्हणजेच चिंचवाड हे गाव .
चिंचवाड
गावात विकास कामाबरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
गावातील लोकांना आर्थिकदृष्ट्या आणि मांनासिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी गावात विकास कामाबरोबर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
चिंचवाड
सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. विविध दूध संस्था, कृषी सेवा संस्था, आणि पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
चिंचवाड
महिला बचत गट म्हणजे महिलांचा एक समूह जो एकत्र येऊन नियमित बचत करतो,
त्या बचतीतून एकमेकींना कर्ज देऊन आर्थिक मदत करतो, ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि सामाजिक सक्षमीकरण मिळते;
सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं नावाजले जाते.
चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्येOPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार
माननिय लोकनियुक्त
ग्रामपंचायत चिंचवाड
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
चिंचवाड गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ .श्रद्धा प्रशांत पोतदार आहेत .त्यांचा कालावधी दि ५ /१२ /२०२३ ते दि .४ /१२ /२०२८ पर्यंत आहे .तसेच चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्ये OPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.
आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://www.grampanchayatchinchawad.com” ह्या वेबसाईट ची निर्मिती केली.
ग्रामपंचायत चिंचवाड
श्रीमती अश्विनी एच. पाटील
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
. ग्रामपंचायतीचा विकास, सरकारी योजनांची अंमलबजावणी, करवसुली, जन्म-मृत्यू नोंदणी आणि ग्रामसभेचे कामकाज सांभाळणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. हे पद पंचायत राज व्यवस्थेतील थेट लोकांशी निगडित महत्त्वाचा दुवा आहे.ग्रामपंचायत चिंचवाडकडे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्रीमती.आश्विनी पाटील ह्या आहेत .दिनांक २९ /०९ /२०२५ रोजी हजर झाल्या असून येथून त्यांच्या कार्यकाल सुरु झाला .
प्रशासकीय प्रमुख: ग्रामपंचायत कार्यालयाचा दैनंदिन कारभार चालवणे आणि सरपंच/सदस्यांना प्रशासकीय मदत करणे
योजनांची अंमलबजावणी: गावपातळीवर केंद्र व राज्य सरकारच्या (उदा. घरकुल, जलजीवन मिशन, ग्राम सडक योजना) विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
करवसुली व निधी: ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी इत्यादींची वसुली करणे.
जन्म-मृत्यू नोंदणी: गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी निबंधक (Registrar) म्हणून काम पाहणे.
ग्रामसभा व बैठका: ग्रामसभेचे कामकाज चालवणे, इतिवृत्त लिहिणे आणि ग्रामपंचायतीच्या मासिक सभा आयोजित करणे.
आरोग्य व स्वच्छता: गावात सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी पुरवठा आणि दिवाबत्तीची व्यवस्था पाहणे
सरपंच म्हणजे गावातील ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो, जो गावाच्या विकासासाठी आणि कारभारासाठी जबाबदार असतो, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवा पुरवतो आणि ग्रामसभेचे कामकाज पाहतो; या पदासाठी थेट निवडणूक होते आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो


भोगम कॉलनीतील रस्ता